- Diwali Celebration on November 7 — volunteers needed for decorations and faral. Sign up to help →
मराठी भाषा, संस्कृती आणि संस्कार
Welcome to Greensboro Marathi Shala
आजची पिढी, मराठीची नाळ — संस्कृतीचा वारसा, उद्याची शान!
Who We Are
ग्रीन्सबोरो मराठी शाळा ही स्वयंसेवकांच्या सहभागातून चालवली जाणारी समुदाय शाळा आहे, जी ग्रीन्सबरो परिसरात वाढणाऱ्या मुलांना मराठी भाषा शिकवते. दर आठवड्याला आमचे विद्यार्थी मराठी वाचणे, लिहिणे आणि बोलणे शिकतात, तसेच खेळ, उपक्रम आणि संवादातून भाषेचा आत्मविश्वास वाढवतात. सण, कथा, गाणी आणि पारंपरिक उपक्रमांद्वारे ते महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीशी जोडले जातात आणि आपल्या मुळांशी नातं अधिक घट्ट करतात. आमचे उद्दिष्ट मुलांना भाषा शिकवण्याबरोबरच त्यांच्यात मराठी संस्कृतीबद्दल प्रेम, अभिमान आणि जपण्याची भावना निर्माण करणे आहे.
Our Mission
पुढील पिढीच्या मनात मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीबद्दल प्रेम, अभिमान आणि आपलेपणाची भावना रुजवणे हे आमचे ध्येय आहे. आनंददायी, समावेशक आणि संस्कारक्षम वातावरणातून मुलांना मराठी शिकण्याचा समृद्ध अनुभव देत, आपल्या समुदायाचा मराठी वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही एकत्रितपणे प्रयत्नशील आहोत.
More About UsUpcoming Events
View all events →Kojagiri Pournima Celebration
No Class — Diwali
Become a Volunteer
Our school runs on the time and talent of parents and community members. Teach, assist, organize — every bit helps.